मुळा धरणात उड्या घेत आंदोलन करणाऱ्या १३ जणांवर गुन्हे

बातमी शेअर करा

कृषी सेवक I २२ डिसेंबर २०२२ Iदोन महिन्यांपूर्वी जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे झालेल्या नुकसानीची शासनाकडून मदत मिळत नसल्याने बुधवारी (ता. २१) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शिवसेना, राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी मुळा धरणात उड्या घेत आंदोलन
केले.

तर काहींना उड्या घेण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनी पकडले. आंदोलन करणाऱ्या १३ कार्यकर्त्यांवर राहुरीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नगर जिल्ह्यात दोन-तीन महिन्यांपूर्वी जोरदार पाऊस, अतिवृष्टीने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाने पंचनामे केले, परंतु अजूनही मदत दिलेली नाही.

त्यामुळे बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह राष्ट्रवादी, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दुपारी मुळा धरणावर जाऊन धरणात उड्या मारुन आंदोलन केले. या वेळी पोलिसांनी धाव घेत आंदोलकांना पकडले. पोलिसांनी या वेळी आंदोलन करणाऱ्या १३ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र मोरे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे रावसाहेब खेवरे, भागवत निमसे, राहुल चोथे, अब्दुल हमीद राजमहंमद पटेल, विजय शिरसाट, प्रशांत शिंदे, विशाल तारडे, कैलास शेळके, सुनील शेलार, मीनानाथ पाचरणे, सुभाष चोथे, विठ्ठल सूर्यवंशी या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या कार्यकर्त्यांना नंतर जामीन देण्यात आला आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम