मराठवाड्यातील साखर कारखान्यांमध्ये ७३ लाख टन उसाचे गाळप

बातमी शेअर करा

कृषी सेवक I २२ डिसेंबर २०२२ Iमराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत आतापर्यंत ५६ साखर कारखान्यांनी ऊस गाळपाला (Sugarcane Crushing) सुरुवात केली आहे. या कारखान्यांनी १९ डिसेंबर अखेरपर्यंत ७३ लाख ४७१ टन उसाचे गाळप करून ६३ लाख ९१ हजार ५९५ क्विंटल साखरेचे उत्पादन केल्याची माहिती साखर विभागाच्या सूत्रांनी दिली.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा उसाचे गाळप वेगाने सुरू झाले आहे. गाळपाला सुरुवात करणाऱ्या ५६ कारखान्यांमध्ये २३ सहकारी तर ३३ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. २३ सहकारी साखर कारखान्यांमध्ये उस्मानाबादमधील चार, औरंगाबादमधील दोन, जालना व हिंगोलीतील प्रत्येकी तीन, बीड व लातूरमधील प्रत्येकी पाच व नांदेडमधील एका सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे. तर ३३ खासगी साखर कारखान्यांत उस्मानाबादमधील आठ, औरंगाबादमधील तीन, जालन्यातील एक, बीडमधील दोन, परभणीतील सात, हिंगोलीतील दोन, नांदेड व लातूरमधील प्रत्येकी पाच साखर कारखान्यांचा समावेश आहे.
स गाळतात उस्मानाबाद जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी सरासरी ८.०२ टक्क्यांचा साखर उतारा राखला आहे. औरंगाबादमधील कारखान्यांनी ९.४२ टक्के, जालन्यातील साखर कारखान्यांनी ९.०५ टक्के, बीडमधील साखर कारखान्यांनी ७.०७ टक्के, परभणीतील साखर कारखान्यांनी ८.८६ टक्के, हिंगोलीतील कारखान्यांनी ९.३० टक्के, नांदेडमधील कारखान्यांनी ९.११ टक्के तर लातूर जिल्ह्यातील कारखान्यांनी ९.२४ टक्के साखर उतारा राखला आहे.
जिल्हा… कारखाने… ऊस गाळप (टनांत)… साखर उत्पादन (क्विंटल)
उस्मानाबाद… १२…२०१८४९१… १७४०३७०
औरंगाबाद… ५…. ६२५२१६… ५८९००५
जालना… ४…. ६८२५६३… ६१७६७०
बीड…. ७…. ९२०११०… ६५०२०५
परभणी… ७…. ७७८३२२…. ६६९५२५
हिंगोली… ५…. ५३५८९८…. ५२५०८०
नांदेड…. ६…. ६३५९५६…. ५७९२७०
लातूर…. १०…. ११०४९१५… १०२०४७०

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम