काळ्या टोमॅटोची लागवड

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २२ नोव्हेंबर २०२२ | सध्या भारतात खूप लोकप्रिय होत आहे. याला इंग्रजीमध्ये इंडिगो रोज म्ह्टलं जाते. यातील सर्वात मोठा गुण म्हणजे हे कॅन्सरसारख्या गंभीर रोगात याचा उपयोग केला जातो. याशिवाय हे खूप प्रकारच्या रोगात कारागार म्हणून काम करतो. इंग्रजी मध्ये इंडिगो रोज म्हणणार्‍या या काळ्या टमाटयांची शेती आता भारतात पण केली जाते. काळ्या टमाटयांची पहिली बाग ही युरोप मध्ये तयार केली गेली होती. इंडिगो रोज रेड आणी जांभळ्या टमाटरचे बीज मिळून नवीन बीज बनवले गेले जे हे पूर्णतः संकरित वाण आहे. याचे बीज ऑनलाइन पण घेऊन मागवता येतात. एका बियाणाच्या पाकेटची किंमत ११० रुपये असून यात १३० बीज असतात. हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यामधील ठाकूर अर्जुन चौधरी काळ्या टमाटरच्या बीजांची विक्री करतात आणी भारतातील बागायती पिकाबरोबर यानी काळ्या टमाटरला आपल्या बागेत जागा दिली.

याची शेती पण लाल टमाटर सारखीच होते यात वेगळं काही करण्याची गरज नाही. अजून भारतात काळ्या टमाटरची शेती केली जात नाही पण या वर्षी पहिल्यांदा याची शेती केली जाईल. शेतकर्‍यांनुसार, या प्रकारचे टमाटर थंड भागात वाढीव होत नाही. त्याकरता उष्ण क्षेत्र आवश्यक आहे. काळ्या टमाटरला लाल टमाटरच्या तुलनेत खूप उशिरा फळ लागतात. हिवाळ्यातील जानेवारी महिन्यात याची पेरणी केली जाते व उन्हाळ्यातील मार्च-एप्रिल पर्यंत आपल्याला काळे टमाटर मिळतात. शेतकर्‍यांनुसार याची वेगळी गोष्ट म्हणजे याला हृदयविकारी आणी मधुमेहाचे रोगी पण खाऊ शकतात. काळे टमाटर बाहेरून काळे व आतून लाल असतात, यांना कच्चे खाल्ल्यास हे जास्त गोड लागत नाही आंबट लागतात. याची चव नमकीन सारखी आहे.

पहिल्यांदा असं झाल की कोणतं टमाटर त्वचेसाठी चांगलं मानलं जात आहे. काही संशोधनमध्ये असं पुढे आलं की काळे टमाटर हे वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांशी लढण्यासाठी कारागर आहे जसे- कॅन्सर, मधुमेह, केलेस्ट्रोल इत्यादी. त्याच बरोबर हे डोळ्यांची दृष्टी वाढवण्यास खूप फायदेशीर मानलं जाते. तसेच हे यकृताची सुरक्षा, रक्तदाबच स्तर कमी करण्यास काळे टमाटर खूप उपयोगी आहेत.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम