रब्बी पिक विमा

बातमी शेअर करा

 

कृषी सेवक | २२ नोव्हेंबर २०२२ |रब्बी पीक विम्याचा भरणा सुरू झालेला आहे. इच्छुक शेतकरी चालू हंगामामधील Rabbi Pik Vima 2022 रब्बी पिकासाठीचा विमा ऑनलाईन पद्धतीने उतरवू शकतात. रब्बी पिकाचा विमा शेतकऱ्यांना काढण्यासाठी जवळच्या सीएससी केंद्रामध्ये भेट द्यावी लागेल, त्याचप्रमाणे शेतकरी स्वतःसुध्दा मोबाईलमध्ये विमा काढू शकतात.

रब्बी पिक विमा या संदर्भातील अर्ज कसा भरावा? कागदपत्रे कोणती लागतील? अर्ज करण्याची सोपी पद्धत कोणती असेल? रब्बी पिक विमा स्वयंघोषणापत्र ,रब्बी पिक विमा चार्ट, पीकपेरा इत्यादी बद्दलची संपूर्ण माहिती …

विमा भरण्याचा फायदा काय : प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विमा उतरवल्यानंतर त्या पिकाशी निगडित विमा संरक्षण दिलं जातं, ज्यामध्ये कमी पाऊस, पावसाचा सतत खंड, अतिवृष्टी, जास्त तापमान इत्यादी पीक नुकसानीच्या बाबी लक्षात घेऊन नुकसान झालेल्या परिस्थितीनुसार शेतकऱ्यांना विमा रक्कम अदा करण्यात येते.
रब्बी पिक विमा महाराष्ट्र 2022 आवश्यक कागदपत्र

शेतकऱ्यांचा आधारकार्ड
बँक पासबुक
सातबारा व 8 अ उतारा
पिकपेरा स्वयंघोषणापत्र

रब्बी विमा 2022 ऑनलाईन अर्ज कसा भरावा ?

शेतकऱ्यांना दोन पद्धतीने रब्बी पिक विमा भरता येतो. एक म्हणजे जवळच्या सीएससी केंद्रामध्ये जाऊन व दुसरा म्हणजे स्वतःहून मोबाईलवरती किंवा कम्प्युटरवरती.
ऑनलाइन पीक विमा भरण्यासाठी सर्वप्रथम pmfby.gov.in या वेबसाईटवरती यायचा आहे.
वेबसाईटवर आल्यानंतर फार्मर कॉर्नर नावाचा एक ऑप्शन असेल त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे.
त्यानंतर शेतकऱ्यांनी आपला मोबाईल क्रमांक, ओटीपी टाकून मूलभूत अशी माहिती फॉर्ममध्ये भरून घ्यायची आहे.
मूलभूत माहिती टाकल्यानंतर शेतातील पिकाची माहिती क्षेत्रानुसार टाकावी लागेल, त्यानंतर भरावयाची विमा रक्कम दाखवली जाईल.
विमा रक्कम तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय इत्यादी माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने Pay करू शकता. पिक विमा रक्कम ऑनलाईन भरल्यानंतर तुम्हाला पॉलिसी नंबर भेटेल तो Policy Number भविष्यकाळासाठी जपून ठेवायचा आहे.

रब्बी पिक विमा अर्जाची शेवटची तारीख

चालू हंगाम 2022-23 वर्षासाठीचा रब्बी पीक विमा भरण्याची अंतिम दिनांक 31 डिसेंबर 2022 देण्यात आले आहे, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपला Rabbi Pik Vima 2022 डिसेंबर 31 पूर्वी भरून घ्यावा.

रब्बी पीक विमा ऑनलाईन घरबसल्या अर्ज करता येतो का ?

शेतकऱ्यांना आता ऑनलाईन घरबसल्या फॉर्म भरण्याची सेवा देण्यात आली आहे, त्यासाठी शेतकरी pmfby या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात. CSC केंद्राच्यामाध्यमातूनसुध्दा शेतकऱ्यांना पीक विमा भरता येतो.

रब्बी पीक विमा 2022-23 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम