सेंद्रीय शेती काळाची गरज

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २२ नोव्हेंबर २०२२ | रासायनिक शेतीचे दुष्परिणाम लक्षात आल्याने बहुतांश शेतकरी आता सेंद्रीय शेती कडे वळत आहे. चला तर जाणून घेऊ, सेंद्रीय शेती म्हणजे काय. कोणत्याही रासायनिक घटकाचा वापर न करता नैसर्गिक संसाधने वापरून केलेली शेती म्हणजे सेंद्रीय शेती होय.

सेंद्रीय शेतीचे फायदे –

मानवी आरोग्याला पोषक असे विषमुक्त पिक उत्पादन येते.
जमीनीची कोणतीही हानी होत नाही.
पर्यावरण संतुलन राखले जाते.
जमीनीची कार्यक्षमता वाढते.
प्रदूषण विरहित शेती पद्धती
मृदा आणि जल संवर्धन होते.

सेंद्रीय शेतीचा अवलंब करताना आपण खालील बाबींचा समावेश करावा.

जनावरांचे मलमुत्र, काडीकचरा, पालापाचोळा पिकाचे अवशेष यांचा सेंद्रीय खते निर्मितीकरिता वापर करावा.
दशपर्णी अर्क, तांदूळ पाणी, निम अर्क, हिंगनास्त्र, गोमूत्र इत्यादीचा पिक संरक्षण करिता उपयोग करावा.
खते म्हणून कंपोस्ट, गांडूळ खत, पेंड इत्यादी बाबीचा वापर करणे.
कीटक संरक्षण म्हणून रक्षक सापळे वापरावेत.
जैविक कीटकनाशक फवारणी करावी.
जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्यासाठी नैसर्गिक आच्छादन जसे की पालापाचोळा, गवत, उसाचे पाचट इत्यादी गोष्टींचा वापर करावा.
सेंद्रीय शेती मध्ये विविध पिक पद्धती अवलंब केला जातो. जसे की आंतरपीक, मिश्रपीक, वनशेती, पिक फेरपालट, कुरण पद्धती.
रासायनिक खतांला पर्याय म्हणून सेंद्रीय तसेच जिवाणू खते वापर करावा.
जमिनीला अन्नद्रव्यांच्या योग्य पुरवठासाठी हिरवळीचे खत वापरावे.

सेंद्रीय शेती प्रमाणीकरण –

सेंद्रीय शेतीमालाची वाढती मागणी आणि वाढलेली स्पर्धा यामध्ये ग्राहकाची फसवणूक होऊ नये आणि सेंद्रीय शेती उत्पादक शेतकऱ्यांना कायदेशीर आधार म्हणून सेंद्रीय शेती प्रमाणीकरण प्रक्रिया सुरू आहे.
सेंद्रीय शेती मानके प्रत्येक देशात बदलतात.
भारतात सेंद्रीय शेती प्रमाणीकरण हे केंद्रीय संस्था अपेडा द्वारे करण्यात येते. याकरिता विविध मानके ठरविण्यात आली आहे.
सेंद्रीय शेती प्रमाणीकरण आणि सेंद्रीय शेतमाल प्रमाणीकरण या दोन्हींचे प्रमाणीकरण करणे आवश्यक असते.
सेंद्रीय शेती प्रमाणीकरण संस्था मानके तपासणे, उत्पादकांना प्रमाणपत्र किंवा परवाना देणे इत्यादी कामे करतात.

ज्या शेतकरी बांधवांना सेंद्रीय शेती प्रमाणीकरण करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी आपल्या जवळील कृषी अधिकारी कार्यालय, गावातील कृषी सहायक कार्यालय, कृषी विज्ञान केंद्र येथे संपर्क साधावा.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम