कोरड वाहू शेतीमध्ये चिंच लागवड

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २४ नोव्हेंबर २०२२ | पाहिजे त्या प्रमाणात चिंचेचे लागवड क्षेत्र नाही. परंतु कोरडवाहू शेतीसाठी चिंच लागवड एक वरदान ठरू शकते. चिंच लागवडीत जास्त काही व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करण्याची गरज नसून एक जमिनीची निवड आणि चिंचेच्या प्रमुख जाती इत्यादी गोष्टी माहित असणे आवश्यक आहे. चिंचेची लागवड पद्धत आणि खत व्यवस्थापन यावर विशेष लक्ष दिले तर चिंच लागवड एक वरदान ठरू शकते. या लेखात आपण चिंच लागवड विषयी थोडक्यात माहिती घेऊ.

चिंचेची लागवड

1- तुम्हाला जर चिंचेचे रोप किंवा कलम यांचे लागवड करायची असेल तर त्यासाठी एक बाय एक बाय एक मीटर आकाराचे खड्डे खोदून घ्यावेत.

ज्या वेळेस तुम्ही एकटे भराल त्यावेळी खड्ड्याच्या तळाशी दहा ते पंधरा सेंटीमीटर उंचीपर्यंत पालापाचोळा टाकावा व त्यानंतर चांगले कुजलेले शेणखत अंदाजे पंधरा किलो, नत्र, स्फुरद आणि पालाश या मुख्य अन्नद्रव्ये यांचे मिश्रण शंभर ग्रॅम आणि 200 ग्रॅम निंबोळी आणि माती यांचे मिश्रण करून खड्डे भरावेत. खड्डे भरताना मातीत 100 ग्रॅम कीडनाशक पावडर मिसळली तर फायद्याचे ठरते.

2- एक दोन चांगले पाऊस पडल्यानंतर रोप किंवा कलमांची मुख्य शेतात लागवड करावी. त्यामुळे पावसाळी दमट हवामानाचा झाडाच्या वाढीसाठी भरपूर फायदा होतो. झाडाचे मर कमी होते व झाडाची वाढ जोमदार होते.

3- उन्हाळ्यामध्ये आवश्यक ओलावा टिकून राहावा यासाठी हा यामध्ये वाळलेले गवत, पाचटाचे आच्छादन किंवा भुसा वगैरे यांचा वापर फायद्याचा ठरतो.

4- चिंचेच्या झाडाची वाळवी किंवा मूळकूज इत्यादीपासून बचाव करण्यासाठी शिफारसीत बुरशीनाशक व कीटकनाशकांचे आळवणी प्रत्येक रोपाच्या आळ्यात करावी.

‘या’ गोष्टींची काळजी घेतली तर मिळेल भरपूर उत्पादन

1- चिंचेच्या झाडाला वळण देणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी जेव्हा झाड एक मीटर उंचीची होईल तेव्हा त्याचा शेंडा खुडावा. कारण यामुळे चारी दिशांना चिंचेच्या फांद्यांची वाढ होते व आकार देखील डेरेदार होतो.
2- चिंचेच्या झाडाची इतर फळबाग प्रमाणे नियमित छाटणी करण्याची आवश्यकता नाही. आत्ता जेव्हा तुम्ही दरवर्षी चिंचा तोडल्यानंतर झाडावर जे काही वाळलेल्या फांद्या असतात त्या कापून काढाव्यात.

3- जेव्हा चिंच काढणी पूर्ण झाल्यानंतर बागेला पाण्याचा चांगला ताण द्यावा. यामुळे फुलधारणा जास्त प्रमाणात होते व फुलांचे रूपांतर फळांमध्ये झाल्यानंतर पाणी द्यावे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम