कळमना बाजार समितीमध्ये आगीत कोट्यवधींची मिरची जळून खाक

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २४ नोव्हेंबर २०२२ | नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे व्यापारी आणि शेतकरी याचे मोठे नुकसान झाले आहे. येथील कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली. ही घटना मध्यरात्री दोन वाजन्याच्या सुमारास घडली.

यामुळे परिसरात मोठी गर्दी झाली होती. यामध्ये लाल मिरची होती. ती जळून खाक झाली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. या आगीच्या घटनेनंतर व्यापाऱ्यांमध्ये बाजार समिती प्रशासनाविरोधात रोष निर्माण झाला आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण देखील होते. काही वेळानंतर ही आग आटोक्यात आली.

या घटनेची माहती मिळताच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं. नागपूर कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती ही नागपूरच्या वेशीवर आहे. तिथपर्यंत अग्निशामक दलाच्या गाड्या पोहोचेपर्यंत आग चांगलीच पसरली होती. यामध्ये जीवित हानी झाली नसली तरी मिरचीचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

 

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम