६ एकर शेतीमध्ये भाजीपाला पिकांची लागवड; शेतकरी करतोय लाखोंची कमाई!

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ५ एप्रिल २०२४ | शेतकरी यापूर्वी केवळ पारंपरिक पिकांच्या माध्यमातून शेतीतून उत्पादन घेत होते. परंतु, मागील दोन दशकांमध्ये आधुनिक पद्धतींचा झालेला विकास आणि प्रगत तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना अल्पावधीत लाखोंचे उत्पादन मिळवणे आता शक्य झाले आहे. महाराष्ट्रात देखील मागील काही काळामध्ये आधुनिक पद्धतीने फळे, भाजीपाला आणि फुलशेती करण्याची प्रमाण वाढले आहे.

 

जसपाल सिंह असे या शेतकऱ्याचे नाव आहे, ते हरियाणा राज्यातील सिरसा जिल्ह्यातील रहिवासी असून जसपाल हे पूर्वी पारंपारिक पद्धतीने धान आणि गहू या पिकांची लागवड करत होते. परंतु, शेतीच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न हे खूपच कमी असल्याने त्यांनी भाजीपाला शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. ते सध्या आपल्या शेतीमध्ये दुधी भोपळा, डांगर, फ्लॉवर, टोमॅटो, गिलके, दोडका या भाजीपाला पिकांची हंगाम व बाजारभावाच्या अंदाजानुसार शेती करत आहे. तर उन्हाळ्याच्या हंगामामध्ये ते टरबूज लागवड करत आर्थिक नफा मिळवत आहे.

 

paid add

जसपाल सिंह सांगतात, आपण शेतीमध्ये सर्वाधिक फ्लॉवरची लागवड करतो. फ्लॉवरच्या शेतीसाठी आपण ‘मैनर’ वाणाची निवड केली आहे. त्यातून आपल्याला भावातील चढ-उतार लक्षात घेता प्रति एकरी १.५ लाख रुपयांची कमाई सहज मिळते. या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे हे वाण उन्हाळ्याच्या हंगामात तीन महिन्यात तर हिवाळ्याच्या हंगामात अडीच महिन्यात तोडणीला येतात. फ्लॉवरला ४० रुपये प्रति किलोपर्यंत दर सहज मिळतो. याशिवाय आपल्याला दोडका लागवडीतून प्रति एकरी २.५ लाख रुपये कमाई मिळते. ज्यास १५ ते ४० रुपये प्रति किलोपर्यंतचा दर मिळतो. याव्यतिरिक्त आपण अन्य भाजीपाल्याची हंगामानुसार कमी -अधिक प्रमाणात शेती करत असल्याचे जसपाल यांनी म्हटले.

 

जसपाल सिंह सांगतात की गेल्या दोन दशकांपासून आपण भाजीपाला शेती करत आहे. विशेष म्हणजे आपले भाजीपाला शेतीतून यश पाहून, आता आजूबाजूचे शेतकरी देखील भाजीपाला शेतीसाठी प्रेरित होऊन उत्पादन घेत आहे. ज्यामुळे सध्याच्या घडीला आपल्या आजूबाजूचा प्रदेश भाजीपाला शेतीच्या उत्पादनाचे केंद्र बनल्याचे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे व्यापारी थेट बांधावर येऊन, भाजीपाल्याची खरेदी करत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होत असल्याचे जसपाल यांनी सांगितेल.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम