शेतकऱ्याने चक्क कलम पद्धतीने एकाच झाडाला उगवलेत टोमॅटो सह वांगी!

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ५ एप्रिल २०२४ | महाराष्ट्र राज्यात शेतकरीराजा मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकांचे उत्पादन घेत असतात. अनेक हंगामात शेतकरी बांधव वेगवेगळ्या प्रकारची भाजीपाला पिके घेत असतात. विशेष बाब म्हणजे बाजारात भाजीपाल्याला बाराही महिने मागणी असते. ज्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचे उत्पन्न देखील मिळते. परंतु, आता एका शेतकऱ्याने एकाच झाडावर टोमॅटो आणि वांग्याचे उत्पादन घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्याने चक्क कलम पद्धतीने एका झाडावर वांगी आणि टोमॅटो लागवड केले आहे.

देवेंद्र दवंडे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. देवेंद्र दवंडे मध्यप्रदेशच्या बैतूल जिल्ह्याचे रहिवासी असून प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळख असलेले देवेंद्र हे यु-ट्यूबवर बघत बघत नवनवीन शेतीमध्ये प्रयोग करत असतात. त्यातूनच त्यांनी कलम करण्याची प्रशिक्षण घेतले. ज्यामुळे त्यांनी यु-ट्यूबवर पाहून तामिळनाडू येथून ‘टर्की बेरी’ या झुडूप आणि काटेरी स्वरूपात असलेल्या बारमाही वनस्पतीची काही रोपे मागवली. ज्यावर त्यांनी टोमॅटो आणि वांग्याचे झाड कलम केले. तीन महिन्यापूर्वी दवंडेंनी ही झाडे कलम होती. सध्या त्यांच्या झाडांना टोमॅटो आणि वांगी लागली आहे.

paid add

कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, “कलम पद्धती ही शेतीसाठीची जगतमान्य पद्धत आहे. जगभरातील विकसित देशांमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात ‘या’ पद्धतीने शेती करत आहे. यात प्रामुख्याने शेतकरी एका-एका झाडावर चार प्रकारची फळे पिकवत आहे. टोमॅटो, वांगी, बटाटा आणि मिरची या पिकांचे एकावेळी उत्पादन घेतले जाऊ शकते.”

देवेंद्र दवंडे सांगतात की कलम पद्धतीने लावलेल्या झाडांना वर्षाला ५० ते १०० किलो वांगी आणि ३० से ४० किलो टोमॅटो उत्पादन मिळते. वांग्याच्या झाडाला वर्षभर फळ मिळू शकते. परंतु, टोमॅटो पिकाला वर्षभरात काही कालावधीपर्यंत फळ मिळत असल्याने उत्पादन कमी मिळते.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम