संत्रा-माेसंबीच्या बागांवर काळ्या माशीचा प्रादुर्भाव

बातमी शेअर करा

कृषी सेवक I ७ डिसेंबर २०२२ Iविदर्भातील 85 टक्के उत्पादनक्षम असलेल्या संत्रा-माेसंबीच्याबागांवर सध्या माेठ्या प्रमाणात काेळशीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. विदर्भातील हवामान या किडीच्या वाढीसाठी अनुकूल असल्याने त्यांच्या मुख्यत्वे तीन पिढ्या पूर्ण होतात. काळ्या माशीच्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडून पानावर व फळांवरस्त्राव साेडतात. आर्द्रतेमुळे बुरशी वाढून पानातील व फळातील अन्नद्रव्य तयार करण्याची प्रक्रिया बाधित हाेते. त्यामुळे फळातील रस बेचव होऊन फळाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतित असतात. संत्रा-माेसंबी फळांच्या गुणवत्ता आणि उत्पादनावर विपरित परिणाम हाेत असून, बागांचा ऱ्हास होतो. त्यामुळे काेळशीच्या तावडीतून संत्रा व माेसंबीच्या बागांची सुटका करण्यासाठी वेळीच याेग्य उपाययाेजना करून या किडीचे व्यवस्थापन (Pest Management) करणे अत्यावश्यक झाले आहे.

काळ्या माशीचे व्यवस्थापन
काळ्या माशीचे पिल्लाचे व्यवस्थापनासाठी मॅलाडा बोनिनेन्सीस या परभक्षक मित्र किडीचे 4-6 अंडी/फांदी हस्त बहाराचे वेळी दोन वेळा सोडावेत.
मृग बहरासाठी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात व ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात तर हस्ता बहारासाठी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात व पुन्हा पंधरा दिवसानंतर व आंबिया बहारासाठी मार्चच्या शेवटचा आठवडा व पुन्हा 15 दिवसानंतर निंबोळी तेल 100 ते 125 मिली अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी. निंबोळी तेल पाण्यात मिश्रण करण्यासाठी 100 मिली निंबोळी तेलात 10 ग्रॅम डिटर्जंट किंवा 10 मिली टिपॉल या प्रमाणात मिसळावे. मृग बहारावरील फवारणीत कॉपर ऑक्सीक्लोराईड 30 ग्रॅम अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन पाण्यात मिसळून फवारणी करावी.
संत्रा पिकावर वेळोवेळी विशेषत: नवतीच्या कालावधीत पाच टक्के निंबोळी अर्काच्या 15 दिवसांच्या अंतराने फवारण्या कराव्यात.
वर निर्देशित काळा माशीचे जीवनचक्र (Life cycle) लक्षात घेऊन प्रौढ काळी माशीच्या कोषातून बाहेर निघण्याच्या अवस्थेत संत्रा बगीच्यात अधून-मधून पिवळ्या रंगाचे पत्र्याचे पृष्ठभागावर एरंडीचे तेल अथवा ग्रीस लावलेले पिवळे चिकट सापळे बगीच्यात उभारावे.
किडीच्या व्यवस्थापनाकरीता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांनी केलेल्या शिफारशीनुसार मोनोक्रोटोफॉस 11 मि.ली. किंवा डायमेथोयेट 10.5 मि.ली. किंवा क्विनॉलफॉस 20 मि.ली. यापैकी एका कीटकनाशकाची सोबत 10 ग्रॅम कार्बेडेझिम किंवा 30 ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड बुरशीनाशकासोबत प्रति 10 लिटर द्रावणात मिसळून फवारणी करावी. दुसरी फवारणी 15 दिवसांनी आवश्यकतेनुसार करावी.
अंडी उबवण्याच्या कालावधीत काही परभक्षी किडी आढळून आल्यास उदा. क्रायसोपा, लेडीबर्डबिटल इत्यादी मित्र किडी आढळून आल्यास फवारणीमध्ये फेरबदल करावा. अशावेळी कीटकनाशकाची मात्रा अर्धी करून निंबोळी तेल 100 मि.ली. किंवा 5 टक्के निंबोळी द्रावणात फवारणी करून फळामुळे होणारे संभाव्य नुकसान टाळता येईल.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम