मुंबईला चक्रीवादळाचा धोका? : हवामान विभागाचे स्पष्टीकरण

बातमी शेअर करा

मागील काही दिवसांपासून मुंबईत चक्रीवादळ येण्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरत होत्या. या अफवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काहींनी असेही सांगितले की, 23 मे ते 27 मे दरम्यान मुंबईत सायक्लॉन वादळ येऊ शकते.

हवामान विभागाचे स्पष्टीकरण

भारतीय हवामान विभागाने (IMD) या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे की, मुंबईला कोणताही चक्रीवादळाचा धोका नाही. बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे, जो शनिवारी चक्रीवादळात आणि रविवारी महाचक्रीवादळात बदलू शकतो. मात्र, या चक्रीवादळाचा प्रभाव मुंबईवर होणार नाही.

अफवा आणि सत्य

सोशल मीडियावर व्हॉट्सॲप आणि इतर माध्यमांतून पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि चुकीच्या बातम्यांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरते. हवामान विभागाने स्पष्ट केले आहे की, चक्रीवादळ बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे आणि त्याचा मुंबईवर किंवा महाराष्ट्राच्या इतर भागांवर कोणताही परिणाम होणार नाही.

नागरिकांसाठी सूचना

हवामान विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी फक्त अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवावा. हवामान विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर आणि सोशल मीडिया हॅंडल्सवर नियमित अपडेट्स दिल्या जातात. त्यामुळे इतर अफवांवर विश्वास ठेवून कोणतेही संदेश फॉरवर्ड करण्यापूर्वी अधिकृत स्रोत तपासावेत.

मुंबईचे हवामान

हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी मुंबईतील हवामानाबाबत माहिती दिली आहे. मुंबईत सकाळच्या वेळी आकाश काहीसे ढगाळ असेल तर दुपारपर्यंत मुख्यतः निरभ्र राहील. कमाल तापमान 34°C आणि किमान तापमान 29°C च्या आसपास असेल.

नागरिकांनी हवामानविषयक माहिती मिळवण्यासाठी हवामान विभागाच्या अधिकृत स्रोतांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम