Pune Accident: नाश्त्यात अंड, 1 तास TV, 2 तास खेळ अन् दुपारी..; पुण्यातील अल्पवयीन मुलाचा बालसुधारगृहातील दिनक्रम
कल्याणी नगरमध्ये झालेल्या पोर्शे कार अपघातानंतर, संबंधित अल्पवयीन मुलाला जामीन रद्द करून बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे. या मुलाला 5 जूनपर्यंत बालसुधारगृहात ठेवले जाणार आहे.
बालसुधारगृहात कुठे ठेवण्यात आले?
अधिकाऱ्यांनी सांगितले की, “चाइल्ड इन कॉन्फिक्ट विथ लॉ (CCL) ला तातडीने येरवाड्यातील नेहरु उद्योग केंद्रातील बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे. तिथे तो इतर मुलांसोबत राहील.” बुधवारी, पुण्यातील बालन्यायालय मंडळाने जामीन रद्द केल्यानंतर त्याला बालसुधारगृहात हलवण्यात आले.
आजचे राशिभविष्य: २५ मे २०२४ साठीचे ज्योतिषीय अंदाज
बालसुधारगृहात या अल्पवयीन मुलाचे दिनक्रम पुढीलप्रमाणे आहे:
– सकाळ : दिवसाची सुरुवात सकाळी 8 वाजता होते. नाश्त्यात अंडी, दूध, पोहे किंवा उपमा दिले जाते.
– प्रार्थना : 11 वाजता सर्व मुलं एकत्र येऊन प्रार्थना करतात.
– शिक्षण : त्यानंतर भाषा शिकवणीला हजेरी लावली जाते.
– दुपार : दुपारच्या जेवणानंतर चार वाजेपर्यंत विश्रांती दिली जाते.
– सायंकाळ : 4 वाजता हलका नाश्ता आणि एक तास टीव्ही पाहण्याची मुभा असते. त्यानंतर दोन तास मैदानी खेळ खेळले जातात.
– रात्री : 7 वाजता रात्रीचे जेवण आणि 8 वाजता झोपण्यासाठी डॉमेट्रीत पाठवले जाते.
जनावरांना चारा कमी पडतोय? “इथे” या; पशुसंवर्धन विभागाने जारी केली चारा उत्पादकांची यादी
मानसिक आधार आणि चाचण्या
बालसुधारगृहात मुलांच्या मानसिक चाचण्या घेतल्या जातात आणि मानसिक तज्ज्ञांचा पाठिंबा दिला जातो. वकील प्रशांत पाटील यांच्या मते, “बालसुधारगृहात मुलांना मुख्य प्रवाहात परत आणण्यासाठी मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत आवश्यक असते.”
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम