कृषी सेवक I २१ डिसेंबर २०२२ I राज्यात अनेक ठिकाणी वातावरणामध्ये चांगलाच बदल होताना दिसत आहे. ऐन हिवाळ्यामध्ये अवकाळी पावसाने (Rain) अनेक ठिकाणी हजेरी लावली होती. तर, काही ठिकाणी कधी थंडी तर कधी ढगाळ वातावरण निर्माण होत आहे.
अशा परिस्थितीत राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. सध्या राज्यात तापमानाच्या पाऱ्यामध्ये घट होताना दिसत आहे. गारठा वाढल्यामुळे अनेक ठिकाणी शेकोट्या पेटल्याचे चित्र दिसत आहे. आजपासून म्हणजेच 21 डिसेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात पहाटे किमान तापमानात घट झाली आहे. ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या अंदाजानुसार, तापमान 10 अंश सेल्सिअस पर्यंत घसरण्याची शक्यता आहे. तर, दुपारच्या वेळी राज्यात कमल तापमानात घट होऊन तापमान 29 अंश सेल्सिअस पर्यंत जाऊ शकते.
आज पासून राज्यामध्ये पुन्हा थंडी वाढायचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या मंदोस चक्रीवादळाचा परिणाम देशात सगळीकडेच झाला आहे. त्यामुळे देशातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. चक्रीवादळामुळे राज्यात थंडी कमी झाली होती. त्याचबरोबर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण झाले होते. तर, काही भागांना या चक्रीवादळामुळे अवकाळी पावसाला सामोरे जावे लागेल. मात्र, आता या चक्रीवादळाचा प्रभाव कमी झालेला असून राज्यात परत थंडीची हुडहुडी वाढणार आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम