जिल्हास्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिनाचे 24 डिसेंबर रोजी आयोजन

बातमी शेअर करा

कृषी सेवक I २२ डिसेंबर २०२२ I शासनाकडुन दिनांक 24 डिसेंबर, 2022 रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्याबाबत सूचना प्राप्त झाल्या आहेत. या वर्षी साजरा करावयाच्या ग्राहक दिनासाठी Effective disposal of cases in Consumer Commissions अशी संकल्पना (थीम) केंद्र शासनाकडून निश्चित करण्यात आली आहे.

दिनांक 24 डिसेंबर, 2022 चा राष्ट्रीय ग्राहक दिनाचा जिल्हा स्तरीय कार्यक्रम नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी जळगाव आणि अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण अयोग यांची प्रमुख उपस्थिती रहाणार आहे. ग्राहकांनी त्यांचे हक्कासाठी दाद कोठे मागावी याबाबत विशेष पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार करण्यात आले असुन त्याचे सादरीकरण या प्रसंगी करण्यात येईल. तसेच ग्राहक प्रबोधनात्मक पथनाटयाचे सादरीकरण देखील या प्रसंगी होईल.
तरी नागरिकांनी ग्राहक म्हणून आपल्याला असलेले अधिकार व ग्राहक म्हणून वावरताना घ्यावयाची सतर्कता यावर मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांनी एका प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम