कृषी सेवक | १ नोव्हेंबर २०२२ | मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण येथील बांबूपासून बनवलेल्या उत्पादनांना भारतातच नव्हे तर जगभरात मागणी आहे. त्यामुळेच डेन्मार्कने मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर बांबू खरेदी करण्याची घोषणा केली आहे. विशेष बाब म्हणजे डेन्मार्क येथील बांबूचा वापर पवन ऊर्जा बनवण्यासाठी करणार आहे. अशा परिस्थितीत मध्य प्रदेशात बांबूची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याची अपेक्षा आहे. त्यांचा बांबू परदेशात विकला गेला तर ही त्यांच्यासाठी आनंदाची बाब असल्याचे शेतकरी सांगतात.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम