नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाईचे वाटप

बातमी शेअर करा

कृषी सेवक I २७ नोव्हेंबर २०२२ I सध्या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सरकारच्या भरपाईचे वाटप सुरू आहे. त्याचवेळी जिल्हा बँकेला प्राप्त झालेल्या तब्बल 691 कोटी 15 लाख या निधीपैकी 2 लाख 50 हजार शेतकऱ्यांना एटीएम आणि शाखेमार्फत 375 कोटी 30 लाख रुपयांचे वाटप झाले आहे. अशी माहिती जिल्हा बँकेचे उपसरव्यवस्थापक मारोतराव शिंदे यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतीतील पिकांचे नुकसान झाले आहे. याच झालेल्या नुकसानीसाठी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी पिक विमा कंपनीकडून 25 टक्के आगाऊ रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला होता

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम