हरभऱ्याच्या बाजारभावात वाढ

बातमी शेअर करा

कृषी सेवक I २७ नोव्हेंबर २०२२ I गेल्या काही हंगामापासून हरभरा पीक शेतकऱ्यांसाठी तोट्याचे ठरत आहे. हमीभावापेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांसाठी हा आतबट्ट्याचा धंदा ठरलाय. पण आता पहिल्यांदाच हरभऱ्याच्या किंमती वाढल्या आहेत.

 

मागील काही दिवसांमध्ये हरभऱ्याचे भाव सतत वाढत आहेत. दिल्लीमध्ये हरभरा अनेक महिन्यांनंतर पहिल्यांदाच प्रति क्विंटल पाच हजार रूपयांपर्यंत पोहोचलाय. पुढील तीन महीने हरभऱ्याची मागणी किमान १५ लाख टन एवढी राहण्याचा अंदाज आहे. व्यापाऱ्यांकडे हरभऱ्याचा स्टॉक खूपच कमी शिल्लक राहिलाय.

त्यामुळे मागील हंगामाच्या अखेरच्या या तीन महिन्यात किमती अजून सुधारून हमीभावाच्या जवळ जाण्याची शक्यता आहे. यंदाच्या रब्बी हंगामात हरभरा लागवड घटण्याची शक्यता आहे. त्यामुळेही हरभऱ्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे. परंतु नाफेडकडे सुमारे २५ लाख टन हरभऱ्याचा स्टॉक आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन महिन्यांमध्ये हरभरा बाजारात तेजी आली तरी दर हमीभावापेक्षा फार वर जाण्याची शक्यता नाही. तसेच दर ४,७००-४,७५० च्या खाली घसरण्याचीही शक्यता नाही. यंदाच्या रब्बी हंगामात हरभऱ्याऐवजी राजमा, इतर नगदी पिके किंवा भाजीपाला लावणे फायद्याचे ठरेल, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम