कृषी सेवक | ७ नोव्हेंबर २०२२ | भाजीपाला पिकांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर वांगी आणि मिरची या पिकानंतर भेंडीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. भेंडी या भाजीपाला पिकाच्या माध्यमातून शेतकरी बंधू अगदी कमीत कमी वेळेत खूप चांगला पैसा कमवू शकतात. परंतु त्यासाठी भेंडी या भाजीपाला पिकाला व्यवस्थित पद्धतीने खत व्यवस्थापन करणे गरजेचे असते. जर या पिकाचा विचार केला तर काही रोगांचा प्रादुर्भाव देखील मोठ्या प्रमाणावर होतो.
तसेच किडींचा प्रादुर्भाव देखील तेवढाच होत असल्याकारणाने अगदी सुरुवातीपासून तंतोतंत व्यवस्थापन केले तर खूप चांगला पैसा भेंडी पिकाच्या माध्यमातून शेतकरी बंधूंना मिळू शकतो.त्या दृष्टिकोनातून या लेखांमध्ये आपण भेंडी पिकाला आवश्यक खत व्यवस्थापन आणि कीड व रोग व्यवस्थापनासाठीचे महत्वपूर्ण उपाय समजून घेऊ.
भेंडी पिकासाठी किड व रोग व्यवस्थापनासाठीचे उपाय
भेंडी पिकावर तुडतुडे, पांढरी माशी तसेच मावा सारख्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. जर रोगांच्या प्रादुर्भावाचा विचार केला तर हळद्या म्हणजेच येल्लो व्हेन मोझॅक हा एक गंभीर बुरशीजन्य रोग असून यामुळे भेंडी पिकाचे खूप नुकसान होते.
त्यासाठी भेंडी पीक उगवल्यानंतर त्याच्यासोबत थायमेट किंवा फ्युरॉडॉन 10 जी बुंद्याजवळ टाकून घ्यावे. असे केल्यामुळे पुढील 30 ते 40 दिवसांपर्यंत भेंडी पिकावर कुठल्याही प्रकारचे किडींचा प्रादुर्भाव होत नाही. दुसरा उपाय म्हणजे थायमेथॉक्साम पंचवीस टक्के डब्ल्यूजी पाच ग्रॅम पंधरा लिटर पाण्यात मिसळून दर पंधरा दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या करावे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम