कृषी सेवक | ७ नोव्हेंबर २०२२ | केळी उत्पादनाबाबत देशात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागत असला तरी व्यापारी दृष्टीने जळगांव जिल्हा हा केळी उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे. त्याचधर्तीवर तळवे हे गावं तालुक्यातील सर्वाधिक केळीचे उत्पादन घेणारे गाव म्हणून पाहिल्या क्रमांकवर आहे.
साधारणतः 500 ते 700 हेक्टर जमिनीत हे उत्पादन घेतले जाते. त्याखालोखाल बोरद गावाचा क्रमांक येतो. परंतू व्यापारीदृष्ट्या तळवे परिसरातील केळीला निर्यातीच्या दृष्टीने अधिक महत्व आहे.तळोदा तालुक्यातील तळवे या गावी अनेक मोठमोठे शेतकरी विविध प्रयोग राबवून शेती करतात. त्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढत असते. तळवे हे गावं 365.59 हेक्टर एवढ्या क्षेत्रफळात वसलेले आहे. शेतीयोग्य जवळजवळ 3500 हेक्टर शेतजमीन या परिसरात आहे. या 3500 हेक्टर अंतर्गत मोठमोठया शेतकर्यांच्या शेतजमिनी असल्याने ते आपल्या शेतामध्ये नाविन्यपूर्ण पिक घेण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात.
गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात केळीची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे.अनेक प्रकारच्या केळीच्या जाती शेतात लागवडीसाठी आणल्या जातात. त्यामध्ये टिशू रोपांना अधिक महत्व दिले जाते.अर्थात केळीबाबत नाविन्यपूर्ण प्रयोग या ठिकाणी राबविताना शेतकरी दिसून येतात. तसेच कांदेबाग या दोन टप्प्यात उत्पादन घेतले जाते.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम