कृषी सेवक | ७ नोव्हेंबर २०२२ | गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेकदा अचानक हवामान बदलत आहे. कधी अचानक जोरदार पाऊस तर कधी थंडी पडत आहे. असे असताना राज्यामध्ये शासन ‘स्कायमेट’च्या महावेध प्रकल्पांतर्गत हवामानाची माहिती घेते.
सध्याचे वेगवेगळ्या भागातील बदलते वातावरण =आणि पावसाची परिस्थिती पाहता अजून हवामान केंद्राची गरज आहे. यामुळे आता सरकारने दहा हजार ग्रामपंचायतीच्या हद्दीत स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्याचे निश्चित केले आहे.
यामुळे याचा फायदा होणार आहे. याबाबत मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत जी ग्रामपंचायत जागा उपलब्ध करून देईल तेथे स्वयंचलित हवामान केंद्र उभारले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.यामध्ये पर्जन्यमान, तापमान, सापेक्ष आर्द्रता, यायची दिशा. वाऱ्याचा वेग आदी प्राप्त होणाऱ्या हवामान विषयक माहिती उपलब्ध करून पीकविमा योजना, हवामान आधारित फळपीक विमा योजना, कृषी हवामान सल्ला व मार्गदर्शन, कृषी संशोधन कार्य, या विविध उपक्रमांची माहिती होणार आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम