शेती सोबत करा हा उद्योग आहे कोट्यावधीची मागणी !

बातमी शेअर करा

कृषी सेवक । २४ जानेवारी २०२३ ।  देशासह राज्यात मोठ्या प्रमाणात अंड्यांचा तुटवडा जाणवू लागला आहे. यामागे कोणताही आजार किंवा अन्य कारण नसून राज्यात वाढलेली थंडी हे कारण मानले जात आहे. ही टंचाई छोटी गोष्ट नसून राज्यात दररोज सुमारे एक कोटी अंड्यांचा तुटवडा असल्याचा दावा केला जात आहे. दिवसेंदिवस अंड्यांच्या तीव्र टंचाईमुळे राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने कंबर कसली आहे. त्यानंतर ग्राहकांना अंडी पुरविण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत.

महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाने अंडी उत्पादन वाढवण्यासाठी पावले उचलली आहेत. अंड्यांचा तुटवडा दूर करण्यासाठी विभागाने अंड्यांचे उत्पादन वाढविण्याचा आराखडा तयार केला आहे. सध्या राज्यात दररोज एक कोटी अंड्यांचा तुटवडा आहे. राज्यात दररोज 2.25 कोटींहून अधिक अंडी विकली जातात. मात्र सध्या उत्पादन कमी असल्याने विक्रीत घट झाली आहे.

या संदर्भात पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ.धनंजय परकाळे यांनी माहिती दिली आहे. त्यांच्या मते, राज्यातील अंड्यांचा तुटवडा पूर्ण करण्यासाठी ग्राहकांना सुरळीत अंड्यांचा पुरवठा व्हावा यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याअंतर्गत कर्नाटक, तेलंगणा आणि तामिळनाडू या राज्यांमधून मोठ्या प्रमाणात अंडी खरेदी केली जात आहेत.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम