सरकार देणार शेतकरीना हे मशीन घेण्यास पैसे !

बातमी शेअर करा

कृषी सेवक । २४ जानेवारी २०२३ ।  देशातील ऊस लागवड करणारा शेतकरी गेल्या काही वर्षापासून हवालदिल झाला होता त्याचे कारणही तसेच होते तो मोठ्या प्रमाणात उसाचे पिक घेत होता पण तो ऊस काढण्यासाठी मजूरांचा तुटवडा व जास्तीची मजुरी द्यावी लागत असे. त्यातच काही मजुरांनी शेतकरी फसवणूक करीत असे. यावर सरकारने मोठा तोडगा काढलेला आहे. ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी आता सरकारकडून पैसे मिळणार आहेत

महाराष्ट्रात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी संख्या आहे. पश्चिम महाराष्ट्रासोबतच मराठवाड्यातही काही भागात उसाचे चांगले उत्पादन घेतले जाते. असे असताना ऊस तोडणीला मजूर मिळत नसल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे.

यासाठी आता केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी आता सरकारकडून पैसे मिळणार आहेत. ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी आर्थिक सहाय्य देण्यासंदर्भात सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला केंद्रीय कृषी मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली आहे. यामुळे आता ही यंत्रणा वाढणार आहे. यामुळे ऊस लवकर गाळपास जाणार आहे. या योजनेचा तपशील लवकरच जाहीर केला जाईल अशी माहिती केंदीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. या निर्णयामुळे आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस तोडणीच्या प्रश्न काही प्रमाणात का असेना सुटण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून १९२ कोटी ७८ लाख रुपये मंजूर केले आहेत. या योजनेसाठी राज्याचा १२८ कोटींचा स्वतंत्र हिस्सा राहणार आहे. यातून ऊसतोडणी यांत्रिकीकरणास एकूण ३२० कोटी रुपये दोन वर्षांसाठी उपलब्ध होणार आहेत.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम