महावितरणचा शेतकरीना मोठा दिलासा : ३० टक्के देणार सूट !

बातमी शेअर करा

कृषी सेवक । २४ जानेवारी २०२३ ।  राज्यातील शेतकरी व महावितरणमध्ये नेहमी वाद सुरु असतात. सध्या महावितरणकडे मोठी थकबाकी झाली आहे. यामध्ये पुणे प्रादेशिक विभागातील कृषिपंप वीज ग्राहकांची थकबाकी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे महावितरणकडून शेतकऱ्यांपुढे अनेक योजना ठेवल्या जात आहेत. यामध्ये थकबाकी वसुलीसाठी राज्य सरकारने नविन कृषिपंप धोरण 2020 तयार केले आहे.

या माध्यमातून 31 मार्च 2023 पर्यंत थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांना थकबाकीवर 30 टक्के सूट देण्यात येणार आहे.
यामुळे ही एक चांगली संधी शेतकऱ्यांपुढे आहे. तसेच विलंब आकार व व्याज माफ करण्यात येत आहे. यामुळे आता तरी शेतकऱ्यांनी पैसे भरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. पुणे प्रादेशिक विभागाचे संचालक अंकुश नाळे यांनी याबाबत माहिती दिली.

डिसेंबर 2022 अखेरपर्यंत महावितरण पुणे प्रादेशिक विभागात कृषिपंप वीज ग्राहकांची थकबाकी 12 हजार 61 कोटी झाली आहे. जानेवारी 2021 ते मार्च 2022 पर्यंत यावर 50 टक्के सूट देण्यात आली होती. एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 पर्यंत या योजनेवर 30 टक्के सूट देण्यात येणार आहे. विलंब आकार व व्याज पूर्णतः माफ करण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना यामध्ये दिलासा देण्याचा महावितरणचा प्रयत्न आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम