कमी तापमानाचा फळबागांवर होणारे परिणाम

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २६ नोव्हेंबर २०२२ | कोणत्याही वनस्पतींच्या वाढीवर हवामानातील फरकाचा कमी जास्त प्रमाणात परिणाम होतच असतो. विविध फळपिकांमध्ये मुख्यतः तापमान बदलाचा परिणाम होतो. हिवाळ्यामध्ये तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाले तर त्याचा पिकांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. अति थंड हवामान, थंडीची लाट, धुके, थंड वारे आणि गारा आदी कारणांमुळे झाडांना इजा होते. परिणामी फळझाडांचे मोठे नुकसान होते. अशा प्रतिकूल हवामानात फळझाडांवर कोणते परिणाम होतात याबद्दल महात्मा फुले कृषी विद्यापीठातील डॉ. आदिनाथ ताकटे यांनी दिली . कमी तापमानामुळे झाडांची वाढ मंदावते, जमिनीचे तापमान कमी होते, वनस्पतींच्या पेशी मरतात, फळपिकांमध्ये फळे तडकतात यामध्ये प्रामुख्याने द्राक्ष केळी, डाळिंब, बोर, अंजीर, पपई इत्यादी फळपिकांना हे प्रमाण जास्त असते. अशा फळांना योग्य बाजारभाव मिळत नाही. केळी पिकांमध्ये घड बाहेर पडत नाही. रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव वाढतो.

– थंड हवामानामुळे फुले, फळे, पाने, खोड आणि मुळ्या यांवर प्रतिकूल परिणाम होतो. अतिशीत हवामानात पेशींमधील पाणी गोठून पेशीकणातील पाणी नष्ट झाल्यामुळे त्या शक्तिहीन होऊन पेशी मरू लागतात. पाणी गोठण्याच्या तापमानात झाडाची पाने, खोड यांच्या पेशीमधील पाणी गोठण्याची प्रतिकारशक्ती ज्या प्रमाणात असेल त्या प्रमाणात झाडे अशा शीत हवामानाला प्रतिकार करू शकतात.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम