कृषी सेवक | २६ नोव्हेंबर २०२२ | नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांनी नैसर्गिक रंगीत अशा देशी कापूस वाणांचा विकास केला आहे. जंगली कापूस प्रजातींपासून नैसर्गिकरीत्या रंगधारणा असलेल्या तीन वाणातील दोन वाण हे दक्षिण भारतासाठी, तर एक वाण मध्य भारतासाठी प्रसारित करण्यात आला आहे.
कापड उद्योगातून होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी हे वाण मोलाची भूमिका निभावू शकतील, असा विश्वास आहे. कपड्यांच्या निर्मितीमध्ये व रंग देण्याच्या प्रक्रियेमध्ये विविध रासायनिक घटकांचा वापर केला जातो. या उद्योगातून वॉशिंग, ब्लिचिंग आणि डाइंग प्रक्रियेतून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यामध्ये ही रसायने मिसळलेली असतात. त्यामुळे परिसरातील जलस्रोत प्रदूषित होत असून, पर्यावरणाचा ऱ्हास होतो. पाण्यातील विरघळणाऱ्या ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने जलचरांवरही विपरीत परिणाम होतो.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम