जळगाव जिल्ह्यातील १२ बाजार समितीची २९ जानेवारीला निवडणूक

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १८ नोव्हेंबर २०२२ | जिल्ह्यातील १४० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकींचा २८ नोव्हेंबरपासून रणधुमाळी सुरू होईल. आता १२ बाजार समित्यांची मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. २९ जानेवारी २०२३ ला बाजार समित्यांच्या निवडणुकाघेण्याचा कार्यक्रम राज्य सहकारी प्राधिकरणाने जाहीर केला आहे. ग्रामपंचायत, बाजार समित्यांच्या निवडणुकांमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांची मतदार याद्या वेगवेगळ्या आहेत. यात विविध कार्यकारी सोसायटी, ग्रामपंचायत सदस्य, हमाल मापाडी, व्यापारी मतदारसंघ, अशा चार संवर्गातून प्रत्येक बाजार समितीत १८ सदस्य निवडून द्यावे लागतील. त्यासाठी बाजार समितीच्या संचालकपदासाठी इच्छुकांनी कंबर कसली आहे. बाजार समित्यांची अंतिम मतदारयादी ७ डिसेंबरला प्रसिद्ध होणार आहे. तोपर्यंत मतदार याद्यांची दुरुस्ती केली जाणार आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम