भडगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा ८० किलो कापूस चोरला

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १८ नोव्हेंबर २०२२ | भडगाव तालुक्यातील लोण येथील दोन शेतकऱ्यांच्या शेतातून ७ हजार २०० रूपये किंमतीचे ८० किलो कापूस चोरून नेल्याचे समोर आले आहे. याबाबत भडगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भडगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील लोण येथील शांताबाई नितीन फुले (वय-३८) आणि त्यांचे शेताच्या शेजारील सबन मोतीलाल भिल यांच्या शेतातून अनुक्रमे ५९ किलो आणि ३० किलो असा एकूण ८० किलो कापूस अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता समोर आले. या संदर्भात शेतकर्‍यांनी इतरत्र परिसरात शोध घेऊन माहिती घेतली असता कोणती माहिती मिळाली नाही. यानंतर त्यांनी भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल हिरालाल पाटील करीत आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम