कृषी सेवक । ३० जानेवारी २०२३ । देशातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना केद्र सरकारने आर्थिक मदत करण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दरवर्षी 6000 रुपये हस्तांतरित केले जातात. हे पैसे प्रत्येकी 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पाठवले जातात. गेल्या अनेक वर्षांमध्ये शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळाली आहे. शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर या योजनेचा त्यांना लाभ मिळेल का?
असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे नियमानुसार, हप्ते घेणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्याचा कोणताही कारणाने मृत्यू झाल्यास, त्याच्या वारसदाराला या योजनेतील रक्कम मिळत राहील. ही रक्कम मिळवण्यासाठी वारसदाराला काही अटी आणि शर्ती पूर्ण कराव्या लागतील. या अटी आणि शर्तीबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
त्याचबरोबर तुम्ही जवळच्या जिल्हा कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधून सविस्तर माहिती मिळवू शकतात. शेतकऱ्याच्या वारसदाराला या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कागदपत्रांची पडताळणी करून घेणे अनिवार्य आहे. यामध्ये वारसदाराला आधार कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक, बँक पासबुक प्रत, शेतीची कागदपत्रे इत्यादी गोष्टी लागतील. या सर्वांची पडताळणी झाल्यानंतर शेतकऱ्याच्या वारसदाराचा या योजनेत समावेश केला जाईल. प्रधानमंत्री योजनेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही 155261 किंवा 1800-115526 या हेल्प नंबर क्रमांकावर कॉल करू शकतात. या क्रमांकावर कॉल करण्यासाठी शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचा शुल्क आकारण्यात येत नाही. हा फोन कॉल शेतकऱ्यांसाठी पूर्णपणे टोल फ्री आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम