कृषी सेवक I २० डिसेंबर २०२२ I देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीन दर पातळी स्थिर आहेत. दर सरासरी ५ हजार २०० रुपयांच्या जवळपास आहेत. त्यामुळे भारताच्या सोयापेंडचे दरही कमी झाले.
परिणामी देशातून सोयापेंड निर्यात वाढली. नोव्हेंबरमध्ये विक्रमी १ लाख ६४ हजार टन सोयापेंड निर्यात झाली, असं साॅल्वेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात एसईएने (SEA) स्पष्ट केले.
साॅल्वेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाने देशातून निर्यात झालेल्या सोयापेंड निर्यातीचा अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात एसईएने म्हटले आहे की, देशात मागील काही दिवसांपासून सोयाबीनचे दर नरमले आहेत. सोयाबीनचे दर क्विंटलमागे सरासरी ५०० रुपयाने कमी झाले आहेत.
सोयाबीन सरासरी ५ हजार ६०० ते ६ हजार १०० रुपयांवरून कमी झाले. नोव्हेंबरच्या शेटवच्या आठवड्यात सोयाबीन ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपयांवर आले. सोयाबीनचा हा दर आजही कायम आहे. मात्र सोयाबीनचे दर कमी झाल्यानंतर सोयापेंडचेही दर नरमले. परिणामी देशातून सोयापेंडची निर्यात वाढली.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम