गोकुळचे सुगंधित दूध विक्रीला प्रारंभ

बातमी शेअर करा

कृषी सेवक I २० डिसेंबर २०२२ I कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ फ्लेवर मिल्क) हे सुगंधित दूध उत्‍पादन विक्रीसाठी उपलब्ध केले आहे. माजी ग्रामविकासमंत्री आमदार हसन मुश्रीफ व माजी गृहराज्‍यमंत्री आमदार सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील यांच्या हस्ते विक्रीस प्रारंभ झाला.

ग्राहकांची सुगंधित दुधाची (फ्लेवर मिल्‍क) मागणी लक्षात घेऊन ‘गोकुळ’च्‍या संचालक मंडळाने २०० मि.लि. पेटजार बॉटलमध्‍ये सुगंधित दूध पॅकिंग करून वितरित करण्‍याचा निर्णय नुकताच घेतला होता.

हे सुगंधित दूध हे गोकुळच्‍या उच्चतम दर्जाच्‍या व नैसर्गिक दुधापासून तयार केलेले आहे. सुगंधित दूध डबल टोन्‍ड दुधापासून तयार केलेले असून, त्‍यावर उच्‍च दर्जाची प्रकिया केल्यामुळे ते दूध नॉर्मल तापमानाला १८० दिवस टिकणारे आहे. त्यामुळे गायीच्‍या दुधाचा वापर‍‍ही वाढणार आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम