वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

बातमी शेअर करा

कृषी सेवक I ९ डिसेंबर २०२२ I शेतात काम सुरू असल्याने शेतात गेलेल्या एका ४७ वर्षीय शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केला. यामध्ये या शेतकऱ्याचे दुर्दैवी निधन झाले. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. कैलास लक्ष्मण गेडेकर असे त्यांचे नाव होते.चंद्रपूर परिसरात हिंस्र पशूंचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. कैलास गेडेकर हे सावली वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या उपक्षेत्र व्याहाड, नियतक्षेत्र सामदा, कक्ष क्र. २०१ मध्ये मंगळवारी सायंकाळच्या सुमारास सरपण गोळा करण्यासाठी गेले होते. मात्र ते परत आले नाहीत.

दरम्यान, रात्री उशिरापर्यंत घरी परत न आल्याने कुटुंबीय व गावकऱ्यांनी शोध घेतला. बुधवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह गावकऱ्यांनी जंगलात शोध घेतला असता कैलासचा मृतदेह आढळून आला. यावेळी सगळ्यांना धक्काच बसला.
शेतालगत असलेल्या झुडपी जंगलात वाघाने कैलासवर हल्ला करून ठार केले व मृतदेह जंगलात फरफटत नेला. यामुळे आता परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे शेतकरी घराबाहेर पडण्यास भीत आहेत.

वाघाने त्‍यांचे केवळ धड शिल्लक ठवले होते. या घटनेची माहिती वनविभागला देण्यात आल्यानंतर ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या मुलीचे लग्न जमले होते. मात्र त्यानंतर ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम