अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा योजनेचा लाभ

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २४ नोव्हेंबर २०२२ |राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी बांधवांना गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे सातत्याने नुकसानीचा सामना करावा लागला आहे. या अनुषंगाने केंद्र शासनाकडून पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे.

आता या योजनेतील महाराष्ट्रातील खरीप हंगामातील विमाधारक शेतकऱ्यांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार राज्यातील खरीप हंगामातील पिक विमा धारक शेतकरी बांधवांचा 1205 कोटी रुपयांचा पिक विमा कंपन्यांनी अजून शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केलेला नाही.

मात्र आता हा राहिलेला पिक विमा संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी कंपन्यांकडून हालचाली तीव्र झाल्या असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहेत. यासाठी आवश्यक सर्व प्रक्रिया कंपन्यांकडून केली जात आहे. कृषी विभागाकडून खरीप हंगामातील पिक विमा धारक शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक विमा देण्यात यावा अशा सूचना संबंधित पिक विमा कंपन्यांना देण्यात आल्या आहेत.

कृषी विभागाने पिक विमा धारक शेतकऱ्यांना पिक विमा मिळावा म्हणून कंबर कसली असल्याने विमा कंपन्यांवर दबाव बनत असून लवकरात लवकर संबंधित शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की 21 नोव्हेंबर पर्यंत पिक विमा धारक शेतकरी बांधवांना 2148 कोटी रुपये एवढी पिक विमा नुकसान भरपाई रक्कम मंजूर झाली आहे.

मात्र यापैकी निम्मे रक्कम देखील शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडून वारंवार यासंबंधीची मागणी शासनाकडे केली जात असून शेतकऱ्यांमध्ये शासनाविरुद्ध ही मोठी नाराजी उभी राहिली आहे. आतापर्यंत पिक विमा कंपन्यांनी 24.91 लाख शेतकऱ्यांना मात्र 943 कोटी रुपयांची नुकसान भरपाई दिला आहे. म्हणजेच 1205 कोटी रुपयांची नुकसान भरपाई पिक विमा कंपन्यांकडे शेतकरी बांधवांची बाकी आहे.

यामुळे शेतकरी बांधवांनी लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून पिक विमा लवकरात लवकर मिळावा यासाठी शासनाकडे निवेदने दिली आहेत. अशा परिस्थितीत आता कृषी विभागाने पिक विमा कंपन्यांना संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम तातडीने जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी कृषी विभागाचा पाठपुरावा सुरु आहे. दरम्यान कंपन्यांकडे बारा लाख वीस हजार पूर्व सूचना दाखल झाल्या आहेत.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम