अतिवृष्टीग्रस्त अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ११९ कोटींच्या नुकसान भरपाईची अपेक्षा

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २४ नोव्हेंबर २०२२ | ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला.

अकोला जिल्ह्यातही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली होती. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तब्बल 119 कोटी रुपयांची नुकसान भरपाई आवश्यक आहे. जिल्ह्यात या पावसामुळे एक लाख 29 हजार 52 शेतकऱ्यांना फटका बसला होता.

या शेतकऱ्यांचे एक लाख 80 हजार 671 हेक्टर क्षेत्रावर असलेल्या जिरायती, बागायती तसेच फळ पिकांचे नुकसान झाले. आता याबाबत जिल्हा प्रशासनाकडून एक संयुक्त अहवाल तयार झाला आहे. या अहवालात बाधित शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई वितरित करणे हेतू निधीची मागणी करण्यात आली आहे. हा सदर अहवाल शासनाकडे सुपूर्द देखील झाला आहे.

paid add

ऑक्टोबर महिन्यात अकोला जिल्ह्यात झालेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांची पुरती वाट लागली. खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले यामुळे लोकप्रतिनिधींकडे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली. या अनुषंगाने शासनाकडून संबंधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले.

आता नुकसानीचे सर्वेक्षण आणि पंचनामे झाल्यानंतर एक अहवाल तयार करण्यात आला आहे. यानुसार अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून 119 कोटी 62 लाख 29 हजार 344 रुपये एवढी निधीची गरज भासणार असून सदर निधीचे शासनाकडे आता मागणी करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम