शेतकरी देतोय मिरचीला बाटलीने पाणी !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | २९ ऑगस्ट २०२३

गेल्या 20 दिवसापासून राज्यात पावसानं दडी मारली आहे. यंदाच्या पावसाळ्यात अद्यापही जोरदार पाऊस न झाल्याने नदी, नाले तहानलेले आहेत. विहिरी, बोअरवेलने तळ गाठला आहे. भविष्यात चारा आणि पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळं खरीप हंगामातील पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. या स्थितीमुळं राज्यातील बळीराजा चिंतेत आहे. दरम्यान, धाराशिव जिल्ह्यात देखील पावसानं पाठ फिरवली आहे.

paid add

उगवलेली पिकं जोपायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. अशातच धाराशिव तालुक्यातील बावी येथील राठोड कुटुंबीय आपल्या शेतातील मिरची वाचवण्यासाठी धडपड करताना दिसत आहे. पाण्याच्या बाटल्या आणून मिरचीला पाणी देऊन पिक वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यातील शेतकरी सध्या चिंतेत आहे. खरीपाची पिकं वाचवायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय.राज्यातील बहुतांश जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्ट महिना संपत आला तरी अद्याप राज्यात म्हणावा तसा पाऊस पडला नाही. अशातच शेतातील पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड आपल्याला पाहायला मिळत आहे. पावसाअभावी हिरवा चारा उत्पादित करता येत नसल्याने दुधाचे उत्पादन घटल्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, टँकरने पाणीपुरवठा केला जात

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम