शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी : थेट खात्यावर येणार अनुदान !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | ३० ऑगस्ट २०२३ | राज्यात गेल्या काही दिवसापासून कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत आले होते. पण आता याच शेतकऱ्यांना मोठा दिलासादायक बातमी आली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील एक लाख ७२ हजार शेतकरी कांदा अनुदानासाठी पात्र ठरले आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया देखील आता सुरू करण्यात आली आहे.

नाशिक मधील शेतकऱ्यांसाठी ४३५ कोटींचे अनुदान यापूर्वीच मंजूर झाले आहे. फेब्रुवारी,मार्च महिन्यात जे सरकराने अनुदान जाहीर केले होते त्याची प्रतिक्षा अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना होती. त्यामुळे सरकारने आता हालचाली करुन अनुदान वर्ग करण्यात सुरुवात केली आहे. नाशिक जिल्ह्यातील १ लाख ७२ हजार शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे.

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कांद्याचे दर घसरल्याने कांदा उत्पादकांचे मोठं नुकसान झालं. त्यामुळे या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अधिवेशनात अनुदानाची घोषणा करण्यात आली. अनुदानाच्या अनुषंगाने प्रशासनाने जिल्ह्यातील एक लाख ७२ हजार १५२ शेतकरी अनुदानासाठी पात्र ठरविले असून त्यांच्या अनुदानापोटी ४३५ कोटी ६१ लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाच्या पणन विभागाकडे सादर केला आहे. उर्वरित २१ हजार ६६६ उत्पादक अपात्र ठरले आहेत.

कांदा उत्पादकांना देण्यात येणाऱ्या अनुदानात नाशिक, नगर आणि सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक रक्कम वितरित करण्यात येणार आहे. मात्र, मागणीच्या केवळ ५३ टक्के रक्कम वितरित करण्यास मान्यता देण्यात आल्याने या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना काही काळ वाट पहावी लागेल. नाशिक जिल्ह्यामधील कांदा उत्पादकांना सरकारने लादलेल्या निर्यातशुल्काने देखील अडचणीत आणले आहे. निर्यात शुल्क वाढवल्यामुळे शेतकरी संतप्त झाले होते. राज्यभरात शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम