शेतकरीने केला जुगाड अन विना लाईट चालणार मोटार !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | २९ ऑगस्ट २०२३ | गेल्या काही वर्षापासून सोशल मिडिया मोठ्या प्रमाणात सुरु झाल्याने राज्यातील अनेक शेतकरी याच्यातून प्रेरणा घेवून काही तरी जुगाड करून आधुनिक शेती करीत उत्पन्न घेत आहे. सध्या राज्यात विजेची मोठी समस्या निर्माण झाली आहे. असे असताना शेतकरी अनेकदा यावर वेगवेगळ्या प्रकारचे उपाय शोधत असतात. शेतकरी आपल्या शेतात शेतीची कामं हलकी करण्यासाठी आपल्या पद्धतीने जुगाड करतात. अनेक गोष्टीमधून ते दिसून येते.

यातून शेतकऱ्यांना फायदा होत असतो. शेतकऱ्यांची काम सोपी व्हावीत किंवा कमी वेळेत व्हावीत यासाठी शेतकरी अधिक धडपड करीत असतो. असेच पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये एका शेतकऱ्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. एक तरुण इंजिन हाताने सुरु करीत आहे. लाईट शिवाय त्यांनी जुगाड करुन मोटार सुरु होत असल्याचे व्हिडीओत दाखवले आहे. हा व्हिडीओ यामुळे व्हायरल होत आहे. यामध्ये एक मोटार, एक बॅटरी असे साहित्य सुरुवातीला दिसत आहे. यामध्ये एकदा मोटार सुरु झाल्यानंतर मोटारमधून पाणी सुरु झाले आहे. त्यावेळी तिथं असलेल्या बोर्डमध्ये पटकन लाईट लागल्या आहेत. नंतर जे पाणी मोटारमधून बाहेर आले आहे. ते पाणी थेट एका मशिनवरती पाडले आहे. यामुळे हे फायदेशीर आहे. त्यामुळे पुढशी मशीन गतीने गोल फिरत आहे. खाली पडलेले सगळं बाजूच्या शेतात जात आहे. स्पीडचे पाणी लाईट तयार करीत आहे. यामुळे हे जुगाड अनेकांना आवडलं असून यावर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम