कृषी सेवक । २१ फेब्रुवारी २०२३। शेतकरी नेहमी आपल्या शेतीतून अनेक पिक घेत उत्पन्न कमवीत असतो पण काही भागातील शेती हि काही मोजक्याच पिकासाठी प्रसिद्ध आहे. व या ठिकाणी कमी खर्चात पिक घेवून भरघोस उत्पन्न शेतकरी घेत असतात.
हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी आता लोप पावत चाललेल्या सुर्यफुलाच्या लागवडीला पसंती दिली आहे. एरवी रब्बी हंगामात शेतकरी गहू, हरभरा, भुईमूग, या पिकांची लागवड करतात. परंतु, या पिकांच्या लागवडीला बगल देत जिल्ह्यातील वसमत औंढा नागनाथ तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सूर्यफूल पिकाची लागवड केली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील बागल पार्डी येथील शेतकरी चंद्रकांत बागल त्यांच्याकडे असलेल्या दीड एकर शेतात सुर्यफुलाचे लागवड केली आहे. सूर्यफूलाचे पीक घेण्यासाठी पेरणीनंतर जास्त काळजी घेण्याची गरज नसते. इतर पिकांसारखे कोणतीही जास्त फवारणी किंवा खते देण्याची आवश्यकता नसल्याचे कमी खर्चात उत्पादन जास्त उत्पादन मिळते शिवाय सूर्यफूल हे पीक तेल बिया मध्ये येत असल्याने मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर असते सध्या सूर्यफूल 6 हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे सूर्यफुलाला बाजारात भाव मिळत आहे. शेतकरी बागल यांना दीड एकर शेतात 15 क्विंटल उत्पादन मिळणार आहे. त्यामुळे खर्च वगळता या सूर्य फुलाच्या पिकातून शेतकरी बागल यांना 50 हजार रुपये निव्वळ नफा मिळणार आहे
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम