शेतकरी पुन्हा संकटात : तुरीचे पिक धोक्यात येणार !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | २४ नोव्हेबर २०२३

देशभरातील अनेक राज्यात कमी अधिक पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे खरीप हंगामातील पिक गेल्यानंतर आता तुरीच्या पिकांकडून शेतकऱ्याला अपेक्षा होती. मात्र, बदलत्या हवामानामुळे तुरीवरही आता ‘फायटोप्थोरा ब्लाईट’ या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. राज्यातील सहालाख हेक्टरवरील तुरीचं पीक धोक्यात आलं आहे.

राज्यात अनेक भागांत दुष्काळजन्य परिस्थिती आहे. मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशातील अनेक भागांत कमी पाऊस पडल्यानं दुष्काळसदृष्य परिस्थिती उद्भवते आणि त्यामुळे खरीप हंगामातील पिकंही आली नाहीत. शेतकऱ्यांना आता थोडीफार अपेक्षा होती ती तुरीच्या पिकाची. पण, राज्यभरात सहा लाख हेक्टरवर तुरीची लागवड करण्यात आली आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी तुरीचं पीक हिरवेगार होतं. मात्र, याही पिकांवर बदलत्या वातावरणामुळे ‘फायटोप्थोरा ब्लाईट’ या बुरशीजन्य रोगानं शिरकाव केला आहे. आता हिरवंगार तुरीचं पीक पिवळं पडून सुकू लागलं आहे. यामुळे मात्र आता शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.

एक आठवड्यापूर्वी हिरवीगार असलेली तूर काही दिवसांतच सुकून पिवळी पडत आहे. राज्यभरात सहा लाख हेक्टरवर तुरीचे पीक लागवड करण्यात आली आहे. मात्र, या रोगामुळे तुरीचं उत्पादन घटण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. फायटोप्थोरा ब्लाईट या रोगाचा प्रादुर्भाव दिसताक्षणी शेतकऱ्यांनी तात्काळ संबंधित कृषी सहाय्यक किंवा कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा, असा आवाहन कृषी अधिकारी करताना आपल्याला दिसत आहे. गेल्या वर्षीही याच रोगानं तुरीचं पीक हे जवळपास 50 ते 60 टक्के उत्पादन घटलं होतं आणि याही वर्षी हीच भीती आता निर्माण झाली आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम