एका संदेशमुळे कांद्याचे भाव पडले

बातमी शेअर करा

कृषीसेवक | २५ नोव्हेबर २०२३

शेतकऱ्यांचा कांद्याला आता भाव येत असतांना काही बाजार समितीमध्ये ५० हजार क्विंटल कांद्याची आवक आहे तर राज्यातील काही जिल्ह्यात पावसाचा अंदाज असल्याने अनेक शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्री करण्यासाठी बाजारात आणला पण एका संदेशामुळे कांद्याचा भाव पडले आहे.

सोशल माध्यमावर मोठ्या प्रमाणात आवक झाल्याचा दावा करत बाजारात व्यापाऱ्यांनी कांद्याचे भाव पाडले. या एकूण परिस्थितीमुळे राज्याच्या तुलनेने सोलापुरातच कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे. सोलापूर बाजार समितीमध्ये या हंगामातील कांद्याची विक्रमी आवक झाली आहे. मोठ्या प्रमाणात बाजारात कांदा विक्री झाल्याने सर्वत्र कांदाच दिसत होता.

विक्रीला आलेल्या कांद्यामध्ये लाल कांद्याचे प्रमाण जास्त आहे. लिलावाच्या अगोदर बाजार समितीच्या परिसरातील व्यापाऱ्यांच्या सोशल मीडियावर ५०० ट्रकपेक्षा जास्त आवक झाल्याचा मेसेज व्हायरल करण्यात आला. परिणामी कांदा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी साखळी करत कांद्याचे भाव पाडले. त्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना उघड्या डोळ्यांनी बाजारातील ही लूट पाहावी लागली.

 

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम