कृषी सेवक | २३ मे २०२४ | पावसाळ्यात साप आणि विंचूचा धोका वाढतो. अडगळीच्या ठिकाणी साप आणि विंचू सापडतात, आणि डिवचल्यास दंश करतात. त्यांचा दंश विषारी असतो.
साप आणि विंचूंची वाढलेली भीती
ग्रामीण भागात साप आणि विंचू यांचा वावर सामान्य आहे. शेतात आणि झुडुपांमध्ये साप नेहमीच असतात. आपल्याकडील बहुतेक साप बिनविषारी आहेत, परंतु काही विषारी सापांमुळे विपरीत परिणाम होऊ शकतात. उदा. घोणस, फुरसे, मण्यार, नाग, चापडा हे विषारी साप आहेत.
विंचू दंश
काळा आणि लाल विंचू हे दोन प्रकार आपल्याकडे आढळतात. काळ्या विंचूचा दंश वेदनादायक असतो परंतु जीवघेणा नसतो. लाल विंचूचा दंश जीवघेणा ठरू शकतो, त्यामुळे वैद्यकीय उपचार गरजेचे असतात.
सर्पदंश लक्षणे
– जखम होणे
– अस्पष्ट दिसणे
– लालसरपणा, सूज
– जखमेजवळ वेदना
– घाम येणे
– श्वासोच्छवास त्रास
– अन्न गिळताना त्रास
– पोटदुखी आणि ताप
सर्पदंश टाळण्यासाठी उपाय
– गवतातून चालताना बूट घालावेत
– नडगी व पोटरीचे संरक्षण करू शकतील अशी आवरणे बांधावीत
– शिळे अन्न घराजवळ टाकू नये
– दगडांमधील फटी, सांदीमध्ये बोट रुतविताना काळजी घ्यावी
– घराबाहेर अनावश्यक वस्तूंचा ढीग करणे टाळावे
– झाडाच्या फांद्या किंवा वेली खिडक्यांपासून दूर ठेवाव्यात
पुणे सह “या” जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटांचा इशारा, वादळी पाऊस
विंचू दंश लक्षणे
काळा विंचू
– दंशाच्या जागेवर असह्य वेदना
– वेदना वर चढत जाणे
– दंशाच्या ठिकाणी जास्त घाम येणे
– स्नायूंची थरथर
– रक्तदाब वाढणे
– नाडी मंदावणे
लाल विंचू
– फुफ्फुसाला सूज येणे
– विषामुळे उलट्या
– दरदरून घाम येणे
– दम लागणे
– हातपाय थंड पडणे
– खोकल्यातून रक्तस्राव
विंचू दंश प्रतिबंध
– विंचू छप्पर, जुने कपडे, चपला, बूट, अडगळीत असतात
– कौलारू घराच्या छताखाली लाकडी सिलिंग ठेवणे
– शेतीकाम करताना जाड कापडी मोजे वापरणे
– गुंडाळलेले अंथरुण, पांघरुण नीट पसरून पाहून झोपणे
– जुनी घरे, झोपड्यांमध्ये कीटकनाशक फवारणी करावी
गव्हाचे बाजारभाव: शरबती गव्हाचा दबदबा कायम, पुणे बाजारात उच्च भाव
विंचू आणि सापांच्या दंशापासून सुरक्षित राहण्यासाठी या उपायांचा अवलंब करा. वेळेत वैद्यकीय मदत घेणे महत्त्वाचे आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम