पुणे सह “या” जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटांचा इशारा, वादळी पाऊस
हवामान विभागाचा सविस्तर अंदाज वाचा एका क्लिकवर..
कृषी सेवक | २३ मे २०२४ | हवामान खात्याचा अंदाज | हवामान खात्याने महाराष्ट्रातील हवामानाबाबत महत्त्वपूर्ण अंदाज वर्तवला आहे. पुण्यासह सहा जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आला आहे. तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे. जाणून घ्या सविस्तर माहिती.
गव्हाचे बाजारभाव: शरबती गव्हाचा दबदबा कायम, पुणे बाजारात उच्च भाव
उष्णतेच्या लाटांचा इशारा
आज पुणे, नाशिक, अहमदनगर, अकोला, जळगाव, नंदूरबार, आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये तापमान वाढणार असून, हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. नागरिकांनी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी.
विदर्भातील वादळी पाऊस
वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, सातारा, कोल्हापूर, आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चक्राकार वारे वायव्य इशान्य राजस्थान आणि पश्चिम विदर्भावर सक्रीय असल्यामुळे हे वातावरण तयार झाले आहे.
सरकी बियाण्याचे दर वाढले: शेतकऱ्यांना द्यावे लागणार ८६४ रुपये
उष्णतेचा भडका
उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यात तापमान ४५ अंशांपर्यंत पोहोचले आहे, जळगावातील तापमानही असह्य झाले आहे. नागरिकांना उकाड्यासह घामाच्या धारांचा सामना करावा लागत आहे.
उपाययोजना
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, २३ ते २६ मे दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच २३ ते २५ मे पर्यंत मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम