कृषी सेवक | २२ मे २०२४ | आज राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये गव्हाची एकूण 26,000 क्विंटल आवक झाली आहे. त्यात मुंबई बाजार समितीत सर्वाधिक 14,455 क्विंटल लोकल गव्हाची आवक नोंदवली गेली आहे.
सरकी बियाण्याचे दर वाढले: शेतकऱ्यांना द्यावे लागणार ८६४ रुपये
बाजारभावांचा आढावा
गव्हाला आज 2,000 रुपयांपासून ते 4,900 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. पुणे बाजार समितीत शरबती गव्हाला सर्वाधिक 4,900 रुपयांचा दर मिळाला आहे.
21 मे 2024 रोजीचे अधिकृत बाजारभाव
– सर्वसाधारण गव्हाला: 2,100 ते 3,450 रुपये
– गव्हाच्या 147 वाणाला: जळगाव बाजार समिती – 2,800 रुपये, अकोट बाजार समिती – 2,700 रुपये
– गव्हाच्या 2189 वाणाला: 2,100 ते 3,000 रुपये
– पैठण बाजार समितीत बन्सी गव्हाला: 2,700 रुपये
– धामणगाव रेल्वे बाजार समितीत हायब्रीड गव्हाला: 2,150 रुपये
महाराष्ट्र हवामान अपडेट: चक्राकार वाऱ्यांची स्थिती, मोसमी पावसाची आतुरता
लोकल गव्हाचे दर
लोकल गव्हाला आज 2,200 रुपयांपासून 4,550 रुपयांपर्यंत दर मिळाला. माजलगाव बाजार समितीत पिवळ्या गव्हाला 3,000 रुपये, उमरखेड डांकी बाजार समितीत 2,350 रुपयांचा दर मिळाला.
शरबती गव्हाचे दर
शरबती गव्हाला आज सरासरी 3,100 ते 4,900 रुपयांचा दर मिळाला आहे. सर्वाधिक दर पुणे बाजार समितीत मिळाला आहे.
गव्हाचे सविस्तर दर
– सर्वसाधारण गहू: 2,100 ते 3,450 रुपये
– 147 वाण: 2,700 ते 2,800 रुपये
– 2189 वाण: 2,100 ते 3,000 रुपये
– बन्सी गहू: 2,700 रुपये
– हायब्रीड गहू: 2,150 रुपये
– लोकल गहू: 2,200 ते 4,550 रुपये
– शरबती गहू: 3,100 ते 4,900 रुपये
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम