काळ्या भातशेतीमुळे शेतकऱ्यांचे जीवन बदलेल

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ३१ ऑक्टोबर २०२२ | चांगले उत्पादन घेण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी विविध प्रयोग करत असतात.असाच एक प्रयोग सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी केला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रथमच काळ्या भात लागवडीचा प्रयोग केला असून तो आता यशस्वी होताना दिसत आहे.
आसाममधून बियाणे मिळवून शेतकऱ्यांनी काळ्या भातशेतीचा प्रयत्न केला आहे. काळ्या तांदळाच्या बियांची किंमत 200 ते 250 रुपये प्रतिकिलो आहे. तालुक्‍यातील सुपीक वातावरणात भात पिकाला बहर येत असून त्यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळत आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम