कपाशी चोरताना एकास रंगेहाथ पकडले

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ३१ ऑक्टोबर २०२२ | शेतातून ३ हजार रुपये किमतीची कपाशी चोरून नेत असताना एकाला रंगेहात पकडण्यात आले आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धरणगाव तालुक्यातील सोनवद परिसरातील अंजनविहीरे शिवारात नागेश्वर उत्तम पाटील(वय ४५) हे शेती करतात. त्यांच्या शेतातून दि २९ रोजी रात्रीच्या सुमारास संशयीत आरोपी खेमचंद तुकाराम पाटील (रा. सोनवद) हा आपल्या दुचाकीवर शेतातून कपाशी वेचून चोरीच्या उद्देशाने घेवूत जात होता. याचवेळी शेती निमबटाईने करणारे प्रवीण पाटील यांनी खेमचंद पाटीलला हटकले. आणि नागेश्वर पाटील यांना बोलावून घेतले. त्यांनी लागलीच धरणगाव पोलिसात धाव घेत संशयित आरोपी खेमचंद पाटील याच्या विरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास पो.ना.दीपक पाटील हे करीत आहेत.

 

 

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम