शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्याचे कृषी मंत्र्यांचे आदेश

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ३१ ऑक्टोबर २०२२ | मुसळधार पावसामुळे मराठवाड्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचवेळी पीक विमा कंपन्यांचे अधिकारी शेतकऱ्यांना योग्य वागणूक देत नसल्याच्या तक्रारी होत्या. दरम्यान, कृषिमंत्री अब्दुल सत्तार परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना काही शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे याबाबत तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत सत्तार यांनी विमा कंपनी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना संबोधित केले.शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्याचे आदेश अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर प्रत्येक तालुकास्तरावर पीक विमा कंपन्यांची कार्यालये तातडीने सुरू करण्यात आल्याने शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

paid add
बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम