राज्यातील शेतकरी वैतागला अन घेतली मंत्रालयातून उडी !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | २९ ऑगस्ट २०२३ | राज्यातील मंत्रालयातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या आवारात पहिल्या माळ्यावर असलेल्या जाळीवर काही शेतकऱ्यांनी उड्या मारल्या आहेत. कुणीही उडी मारुन आत्महत्या करु नये यासाठी जाळी लावण्यात आली आहे. या जाळीवर अमरावती काही शेतकऱ्यांनी उड्या मारत आंदोलन केले आहे.

आपल्या मागण्यांकडे सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत आंदोलकांनी आज (दि.२९) थेट मंत्रालय आंदोलन केले आहे. धरणग्रस्तांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही, असा आरोप देखील आंदोलकांनी केला आहे. अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी येथे अप्पर वर्धा धरण आहे. या धरण परिसरातील धरणग्रस्तांकडून आज थेट मंत्रालयात आंदोलन करण्यात आलं. या धरणग्रस्तांचं मागील अनेक वर्षापासून आंदोलन सुरु आहे. पण अद्यापही या आंदोलकांना न्याय मिळाला नाही. मोर्शीच्या तहसील कार्यालयासमोर या सर्व धरणग्रस्तांचं आंदोलन सुरु आहे. पण त्यांच्या आंदोलनाची दखल घेण्यात आली नाही. त्यांना अजूनपर्यंत न्याय देण्यात आला नाही. त्यामुळे आंदोलकांनी आज थेट मंत्रालयात आगळ्यावेगळ्या पद्धतीचं आंदोलन सुरु केलं.

अप्पर वर्धा कृती समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले आहे. तर या आंदोलनकर्त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न मंत्रालयात उपस्थित असलेल्या पोलिसांकडून करण्यात आला आहे. आम्ही अनेक दिवसांपासून निवेदन देत असून आमच्या मागण्या अजून मान्य होत नसल्याचं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.
अप्पर वर्धा कृती समितीच्या विविध मागण्या आहेत. यात शासनाकडून हक्क्याच्या मोबादल्याची चांगली रक्कम मिळावी, प्रकल्पग्रस्तास सरकारी नोकरी मिळावी, अशा विविध मुद्द्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे. आज आंदोलक मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार होते. मात्र त्यांना मंत्र्यांची वेळ न मिळाल्याने त्यांनी जाळ्यांवर उड्या मारल्याचे सांगण्यात येत आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम