शेतकऱ्यांनी अप्रमाणित किटकनाशक खरेदी करु नये

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २४ नोव्हेंबर २०२२ |  किटकनाशकाची गुणवत्ता तपासणीसाठी मे. ॲग्रीको ऑरगॅनिक्स लिमिटेड, नवी दिल्ली उत्पादित किटकनाशक एसिटामिप्रिड 20 % एस.पी. ट्रेड नाव – टाईमर बॅच नंबर U220113, पॅकींग 100 ग्रॅम या किटकनाशकाचा नमुना शासकीय किटकनाशक तपासणी प्रयोगशाळाकडे पाठविण्यात आला होता. सदर किटकनाशकाचानमुना किटकनाशक तपासणी प्रयोगशाळेत तपासणीतअंती अप्रमाणित आढळून आला आहे. त्यामुळे या किटकनाशकाच्या शिल्लक साठयास विक्री बंदची कारवाई करण्यात आलेली आहे. तरी या बॅचचे या किटकनाशकाची शेतकरी बांधवांनी खरेदी करु नये असे आवाहन कृषि अधिकारी पंचायत समिती चाळीसगाव यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम