कृषी सेवक | २४ नोव्हेंबर २०२२ | मोदी सरकारने महिलांसाठी स्त्री शक्ती योजना सुरू केली आहे. महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेतंर्गत महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी 25 लाख रुपयांपर्यंत विनातारण कर्ज आहे.
देशातील महिलांना वेळेवर कर्ज पुरवठा करता यावा, यासाठी मोदी सरकारने भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियासोबत करार केला आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला कमी व्याजदरात कर्ज मिळेल. तसेच कर्जाची, प्रोसेस देखील सोपी आहे.
स्त्री शक्ती योजनेबाबत. या योजनेच्या कर्जासाठी तुम्हाला कोणत्याही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेत अर्ज करता येईल. मात्र, त्यासाठी कोणत्याही उद्योगात महिलेची कमीत कमी 50 टक्के मालकी असणं आवश्यक आहे.
महिलांसाठी स्त्री शक्ती योजना
महिलांच्या नावावर उद्योग नसेल तर योजनेचा लाभ घेता येणार नाही. भारतातील उद्योजक महिलांना दोन लाख रुपयांपर्यंत व्याज दरात 0.5 टक्के सवलत मिळेल. सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी नोंदणीकृत कंपन्यांना 50 हजारांपासून ते 25 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे.
या योजनेमार्फत फक्त 5 टक्के व्याजदर आहे. महिलांना 5 लाखांपर्यंतचे कर्ज विनातारण मिळेल. या योजनेमुळे उद्योजक महिलांना प्रोत्साहन मिळेल.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम