शेतकऱ्यांना बसू लागला फटका : मालाला मिळत नाही भाव !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | ३० ऑक्टोबर २०२३

देशभरातील अनेक शेतकरी महागाईमुळे त्रस्त झाले आहे. तर शेतातील मालाला देखील भाव मिळत नसल्याने सध्या सर्वच राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकार शेतमालाचे भाव कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यामागे शहरी ग्राहकांच्या खिशाला झळ बसू नये हा उद्देश आहे. मात्र, याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी होत आहे आणि त्यांचे जगणे कठीण होत आहे.

शेतमालाचे भाव कमी करण्याचे सरकारचे अनेक मार्ग आहेत. त्यात निर्यातबंदी, किमान आधारभूत किंमत (एमएसपी) कमी करणे, सरकारी खरेदी कमी करणे इत्यादींचा समावेश होतो. यामुळे शेतकऱ्यांना शेतमालाची योग्य किंमत मिळत नाही आणि त्यांचे नुकसान होते. शेतमालाच्या भावात घसरणीमुळे शेतकऱ्यांच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यात कर्जबाजारीपणा, आत्महत्या, शहरात स्थलांतर इत्यादींचा समावेश होतो.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम