देशात हरभऱ्याचे भाव ५ हजारावर !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | २८ ऑक्टोबर २०२३

देशात गेल्या काही महिन्यापासून मोठी महागाई होत असतांना याचा फटका अनेकांना बसला आहे. यातच सध्या हरभऱ्याचे भाव ५ हजार ५०० ते ६ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान आहेत. देशातील भाव वाढल्याने आयातही गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढत आहे. सध्या रब्बी हंगामातील पेरणी सुरु आहे. पण देशातील पावसाची स्थिती पाहता रब्बी हंगामही अडचणीत जाण्याची शक्यता आहे.

paid add

यंदाच्या हंगामात देशातील हरभरा उत्पादनाला फटका बसू शकतो, असा अंदाज आहे. यामुळे हरभरा भावातील वाढ टिकून राहू शकते. यामुळे आयातही वाढू शकते. पण आयातीचा देशातील भावावर जास्त परिणाम दिसून येणार नाही, भावपातळी टिकून राहू शकते, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम